मुखपृष्ठ > mumbai, Pune > राज्याचा एकूण निकाल ७१.४- परीक्षेत मुलींची बाजी

राज्याचा एकूण निकाल ७१.४- परीक्षेत मुलींची बाजी



राज्यातील लाखो विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागून राहिलेल्या दहावी परीक्षेच्या निकाल आज (शुक्रवार) दुपारी जाहीर झाला. सपूर्ण राज्याचा एकूण निकाल ७१.४% लागला असून मुलीनी बाजी मारली आहे. उत्तीर्ण झलेल्या मुलींची संख्या ७४.१०% तर मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ६८.५८ आहे.

एकूण परीक्षेला बसलेले विद्यार्थी- १६ लाख ३२ हजार ७४८
एकूण उत्तीर्ण झालेले विद्यार्थी- ११ लाख ५९ हजार ९०७

पुणे विभागातून ८०.३९%, मुंबई ८०.३% तर कोल्हापूर चा ७९.७६% एवढा निकाल लागला आहे. तर सर्वात कमी अमरावती विभागाचा निकाल लागला आहे (४३.३२%).

आज दुपारी “ऑनलाईन’ पद्धतीने निकाल जाहीर झाला असून, विद्यार्थ्यांना छापील गुणपत्रिका २७ जून रोजी दुपारी ३ वाजता त्यांच्या विद्यालयांत दिल्या जाणार आहेत. गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही “बेस्ट फाईव्ह’ सूत्रानुसारच हा निकाल जाहीर करण्यात आल्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने कळविले आहे.

निकाल या संकेतस्थळांवर :-
http://mahresult.nic.in
http://www.msbshse.ac.in
http://www.mh-ssc.ac.in
http://www.rediff.com
http://www.studyssconline.com
http://www.myssc.in/sscresult

प्रवर्ग: mumbai, Pune टॅगस्, ,
  1. अद्याप प्रतिक्रिया नाहीत.
  1. No trackbacks yet.

यावर आपले मत नोंदवा