सत्यमेव जयते एक प्रेरणा देणारा कार्यक्रम


नव्याने सुरु झालेल्या आणि सर्व भाषेत चित्रित केलेला अमीर खान चा सत्यमेव जयते हा सध्याचा एक सुंदर कार्यक्रम आणि उपक्रम. नुकताच प्रदर्शित झालेला पहिला भाग हा सर्वांनी आवर्जून पाहावा. देशा मध्ये होणारी भ्रुण  हत्त्या. मुलीना जन्माला येण्या आधीच गर्भात हत्या केली जात आहेत आणि या मध्ये बरेच  डॉक्टर  सुधा सामील आहेत. कायद्याने असलेला गुन्हा हा सरस  पणे चालूच आहे. स्त्रियांवरचे अत्याचार अजून हि चालूच आहे.  या सर्व गोष्टींवर प्रकाश टाकणारा कार्यक्रम म्हणजे सत्यमेव जयते. सर्वांनी आवर्जून पाहावा असा हा कार्यक्रम.

http://www.youtube.com/watch?v=u1vASMbEEQc

शिवसेना, भाजप, रिपाइंचे जागावाटप पूर्ण…

नोव्हेंबर 29, 2011 १ प्रतिक्रिया

आगामी मुंबई महानगर पालिका निवडणुकी करिता महयुतीचे जावा वाटप पूर्ण झले असून याची घोषणा शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपचे नेते खासदार गोपीनाथ मुंडे आणि रिपाइं नेते रामदास आठवले हे तीनही नेते लवकरच करतील अशी माहिती मुंबई भाजपचे अध्यक्ष राज पुरोहित यानी आयोजित केलेल्या प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद मधे बोलले.

सरकार ने दिलेला शब्द पाळला नाही तर पुन्हा बेमुदत् उपोषण करणार.. अण्णा


जर सरकार ने सशक्त लोकपाल आणू असे सांगून पण जर दिलेला शब्द पाळला नाही तर याचा निषेध म्हणून एक दिवसाचे ११ डिसेंबर ला आणि २७ डिसेंबर पासून रामलीला मैदानात बेमूडात उपोषण करणार असा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला.

प्रवर्ग: Uncategorized Tags: , , , ,

“लोकपाल बिल” मध्ये नक्की काय आहे?

ऑगस्ट 21, 2011 4 comments

१. केंद्रामध्ये “लोकपाल” नावाची संस्था काढली जाईल आणि प्रत्येक राज्यामध्ये या संस्थेचा “लोकायुक्त” निवडला जाईल.

२. सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोग यांच्याप्रमाणेच लोकपाल आयोग हा सुद्धा शासनापासून पूर्णपणे स्वतंत्र असेल. कोणताही सारकारी अधिकारी किंवा नेता या आयोगावर नियंत्रण ठेवू शकणार नाही.

३. भ्रष्टाचाराचा कुठलाही खटला वर्षानुवर्षे चालणार नाही. चौकशी साठी जास्तीत जास्त १ वर्ष आणि खटल्यासाठी १ वर्ष दिला जाईल, जेणेकरून २ वर्षांत शिक्षेची अंमलबजावणी होईल.

४.आरोप सिद्ध झाल्यावर सर्व नुकसान त्या व्यक्तीकडून वसूल केले जाईल.

५. सामान्य जनतेला या बिलाचा फायदा काय? …

……आपले कुठलेही सरकारी काम जर सुनिश्चित वेळेत झाले नाही तर लोकपाल विधेयाकानुसार जबाबदार सरकारी अधिकार्‍याकडून दंड वसूल केला जाईल आणि तो नुकसानभरपाई म्हणून आपल्याला दिला जाईल.

६.म्हणजेच, जर तुमचे रेशनकार्ड/ मतदानओळखपत्र/ पासपोर्ट यासाठी निश्चित वेळेपेक्षा जास्त वेळ लागला असेल तर तुम्ही लोकपाल आयोगाकडे जाऊ शकता. लोकपाल तुमचे काम १ महिन्याच्या अवधीत पूर्ण करेल. शिवाय रेशनदुकानावर खराब धान्य, खराब रस्ते, पंचायत फंड घोटाळा अश्या तक्रारीही तुम्ही लोकपालकडे करू शकता. लोकपाल आयोग जास्तीत जास्त २ वर्षांत याविषयी पूर्ण निर्णय देईल.

७.पण या आयोगवर आयुक्त सरकार नेमेल का? नाही! आयुक्ताची निवड ही नागरिक आणि न्यायमूर्ती करतील. कुठल्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय!

८.आणि लोकपालमधलाच एखादा अधिकारी भ्रष्ट निघाला तर? नाही! या आयोगाचे काम पूर्णपणे पारदर्शक असेल. त्या अधिकर्‍याची २ महिन्यात चौकशी करून दोषी आढळल्यास त्वरित हकालपट्टी केली जाईल.

९.मग सध्याच्या भ्रष्टाचार विरोधी यंत्रणा बंद पडणार का? नाही… या सर्व यंत्रणा “लोकपाल” मध्ये समाविष्ट कार्यात येतील.

१०.ज्या व्यक्तीने भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवला आहे त्याच्या जिविताची काळजी घेण्याची पूर्ण जबबदारी लोकपाल आयोगाची असेल.

११.आणि सगळ्यात महत्वाचे… लोकपाल आयोगाकडे कोणताही अधिकारी, नेता आणि न्यायाधीश यांची चौकशी करण्याचे अधिकार असतील.

प्रवर्ग: mumbai, Pune, Uncategorized Tags: , ,

राज्याचा एकूण निकाल ७१.४- परीक्षेत मुलींची बाजीराज्यातील लाखो विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागून राहिलेल्या दहावी परीक्षेच्या निकाल आज (शुक्रवार) दुपारी जाहीर झाला. सपूर्ण राज्याचा एकूण निकाल ७१.४% लागला असून मुलीनी बाजी मारली आहे. उत्तीर्ण झलेल्या मुलींची संख्या ७४.१०% तर मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ६८.५८ आहे.

एकूण परीक्षेला बसलेले विद्यार्थी- १६ लाख ३२ हजार ७४८
एकूण उत्तीर्ण झालेले विद्यार्थी- ११ लाख ५९ हजार ९०७

पुणे विभागातून ८०.३९%, मुंबई ८०.३% तर कोल्हापूर चा ७९.७६% एवढा निकाल लागला आहे. तर सर्वात कमी अमरावती विभागाचा निकाल लागला आहे (४३.३२%).

आज दुपारी “ऑनलाईन’ पद्धतीने निकाल जाहीर झाला असून, विद्यार्थ्यांना छापील गुणपत्रिका २७ जून रोजी दुपारी ३ वाजता त्यांच्या विद्यालयांत दिल्या जाणार आहेत. गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही “बेस्ट फाईव्ह’ सूत्रानुसारच हा निकाल जाहीर करण्यात आल्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने कळविले आहे.

निकाल या संकेतस्थळांवर :-
http://mahresult.nic.in
http://www.msbshse.ac.in
http://www.mh-ssc.ac.in
http://www.rediff.com
http://www.studyssconline.com
http://www.myssc.in/sscresult

आमदार रमेश वांजळे यांचे निधन

जून 10, 2011 2 comments

पुणे – “गोल्डमॅन’ म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात परिचित असलेले खडकवासला मतदारसंघातील मनसेचे आमदार रमेश वांजळे (वय ४५) यांचे आज (शुक्रवार) रात्री ९.५० वाजता आकस्मिक निधन झाले. अत्यवस्थ वाटू लागल्याने त्यांना सायंकाळी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

वांजळे हे नियमित तपासण्यांसाठी पुण्यातील जोशी रुग्णालयात दाखल झाले. त्याच वेळी त्यांना त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना तातडीने अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर तातडीचे उपचार केल्यानंतर जहांगीर रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांच्या तब्येतीचे वृत्त कळताच कार्यकर्त्यांची जहांगीर रुग्णालयात गर्दी झाली.

गरिबांच्या हाकेला धावून जाणारा कार्यकर्ता आणि अंगावरील अडीच किलो सोन्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या वांजळे यांनी अल्पावधीत महाराष्ट्रात आपली प्रतिमा निर्माण केली. आपल्या भारदस्त व्यक्तिमत्त्वामुळे त्यांनी अनेकांना आपलेसे केले. हवेली तालुक्‍यातील अहिरे गावचे सरपंच ते खडकवासला मतदारसंघाचे आमदार असा राजकीय पल्ला त्यांनी गाठला.

२५ वर्षांहून अधिक काळ राजकारणात असलेल्या वांजळे यांनी नऊ वर्षांपूर्वी हवेली पंचायत समितीचे उपसभापतिपद भूषविले होते. त्यांच्या पत्नीही कॉंग्रेस पक्षाच्या चिन्हावर जिल्हा परिषदेच्या सदस्य म्हणून निवडून आल्या.

कॉंग्रेसचे नेते आणि माजी मंत्री (कै.) रामकृष्ण मोरे यांचे वांजळे निष्ठावंत कार्यकर्ते होते. विधानसभेच्या २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत वांजळे यांना खडकवासला मतदारसंघातून मनसेची उमेदवारी मिळाली. ऐन वेळी पक्षबदल करूनही ते पहिल्याच प्रयत्नात चांगल्या मताधिक्‍याने विजयी झाले. आपल्या अंगावरील अडीच किलो सोन्यामुळे सोनेरी आमदार म्हणून ते प्रसिद्ध झाले. विधानसभेतही त्यांनी आपला ठसा उमटविला. विधानसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेण्यावरून अबू आझमी आणि मनसे यांच्यात वाद झाला होता.

Source:- Sakal paper http://72.78.249.107/esakal/20110610/5701063914743789129.htm

छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा..

मार्च 22, 2011 2 comments

निश्र्चयाचा महामेरू, बहुतजनांसी आधारू, अखंडस्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी ।।

नरपती, हयपती, गजपती। गडपती, भूपती, जळपती।पुरंदर आणि शक्ति पृष्ठभागी।।

यशवंत, कीर्तीवंत, सामर्थ्यवंत। वरदवंत, पुण्यवंत, नीतीवंत। जाणता राजा ।।

आचरशील, विचारशील, दानशील। धर्मशील सर्वज्ञपणे सुशील। सकळाठाई ।।

धीर उदार गंभीर। शूर क्रियेसी तत्पर ।सावधपणे नृपवर तुच्छ केले।।

देवधर्म गोब्राह्मण, करावया संरक्षण।।

हृदयस्थ झाला नारायण, प्रेरणा केलीया भूमंडळाचे ठाई, धर्मरक्षी ऐसा नाही।

महाराष्ट्र धर्म राहिला काही, तुम्हा कारणी।।कित्येक दृष्ट संहारली।

कित्येकासी धाक सुटला ।कित्येकाला आश्रयो जाहला

।शिवकल्याण राजा। शिवकल्याण राजा।।शिवकल्याण राजा।।।

छत्रपती शिवाजीराजे भोसले

अधिकारकाळ जून ६, १६७४ – एप्रिल ३, १६८०

राज्याभिषेक जून ६, १६७४

राज्यव्याप्ती पश्चिम महाराष्ट्र, कोकण,सह्याद्री डॊंगररांगांपासून नागपूरपर्यंतआणिउत्तर महाराष्ट्र, खानदेशापासूनदक्षिण भारतात तंजावर पर्यंत

राजधानी
रायगड

पूर्ण नाव शिवाजीराजे शहाजीराजे भोसले

पदव्या गोब्राह्मणप्रतिपालक

जन्म फेब्रुवारी १९१, १६३० शिवनेरी किल्ला, पुणे

मृत्यू एप्रिल ३, १६८० रायगड

उत्तराधिकारी छत्रपती संभाजीराजे भोसले

वडील शहाजीराजे भोसले

आई जिजाबाई

पत्नी सईबाई,सोयराबाई,पुतळाबाई,काशीबाई,सकवारबाई

संतती छत्रपती संभाजीराजे भोसले,
छत्रपती राजारामराजे भोसले

राजघराणे भोसले

राजब्रीदवाक्य
‘प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।’

चलन होन, शिवराई (सुवर्ण होन, रुप्य होन??)
१ – जन्मदिनांकाच्या निश्चितीबद्दल मतमतांतरे आहेत.

माहितिचा स्त्रोत विकिपिडिया.कॉम

थोरल्या आबा साहेबांना मानाचा मुजरा!!!

जय भवानी जय शिवाजी