Archive

Posts Tagged ‘raj thakre’

आर आर पाटील आणि अजित पवार यांच्या वर टीका

जानेवारी 12, 2011 5 comments

raj thakre at aurangabad
औरंगाबाद मध्ये हर्षवर्धन जाधव यांच्या वर झलेल्या हल्ला प्रकरणी आज राज थांक्रे यांनी जाहीर सभा घेतली आणि सगळ्यांचा भरपूर समाचार घेतला. आर आर पाटील आणि उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या वर टीका केली. त्याच प्रमाणे त्यांनी मुख्य मंत्र्यांवर पण हल्ला चढवला. पोलीस उगाचच आमदारावर मारहाण करणार नाहीत. गृहमंत्री आर. आर. पाटील व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशावरूनच पोलिसांनी आमदार हर्षवर्धन जाधव यांना मारहाण केली असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला.

सभेमध्ये राज यांनी संभाजी ब्रिगेड वर पण टीका करत बोलले कि यांना सत्ताधारी राजकीय गटांचा पाठिंबा आहे. या आधी संभाजी ब्रिगेड ने केलेल्या हिंसक कृत्यावर कोणती हि कारवाई करण्यात आली नाही.

राज यांनी सभे मध्ये पोलिसांबद्दल पण उद्गार काढले कि २-४ पोलिसांच्या मुळे पूर्ण पोलिसांना चुकीचे समजू नये. कोणत्या हि लोकांनी कधी हि पोलिसांवर हात उगारू नये आसे हि म्हणाले.

आमदार हर्षवर्धन यांना मारून पोलीस स्टेशन ला नेऊन त्यांना निर्वस्त्र करून मारहाण करण्यात आली. बेदम मारण्यात आल. पण जेव्हा त्यान चौकीत नेला तेव्हा पाऊन तास पोलीस थांबले मग तिकडून फौज आली मग मला सांगा कि पाऊन तास कोणासाठी थांबले होते ते?? वरून आदेशाची वाट पाहत होते असे उद्गार राज यांनी काढले.

दादोजी कोंडदेव यांच्या पुतळ्या प्रकरणी जे चालले आहे ते जातीय राजकारण हे विष आहे. इतिहास जातीच्या चष्म्यातून पाहणे चुकीचे आहे. अशा राजकारणामुळे शिवाजी महाराजांचीच विटंबना होत आहे.

आजच्या सभेसाठी विक्रमी गर्दी झली होती. सभेला सुमारे २५ हजार लोकांची गर्दी होती.

12 तारखेला विस्ताराने बोलणार- राज ठाकरे


हर्षवर्धन जाधव हे मनसेचे कन्नड येथील आमदार. जाधव यांना पोलिसांनी केलेल्या मारहाणीबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी राज ठाकरे औरंगाबाद मध्ये आले. त्यांनी आमदार हर्षवर्धन जाधव यांची घाटी रुग्णालयात जाऊन भेट घेतली.

Raj Thakare

Raj Thakre


या सर्व प्रकरण बद्दल मी येत्या १२ तारखेला जाहीर सभेमध्ये विस्ताराने बोलणार आहोत असे महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

हर्षवर्धन जाधव यांच्या वर मारहाण झाल्यापासून राज ठाकरे हे त्यांच्या आणि त्यांच्या आईंच्या संपर्कात होते. या सर्व प्रकरणाची पाहणी आमदार बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या नेत्यांनी सर्व माहिती घेतली.

राज ठाकरे पत्रकार परिषदेत म्हणाले कि मी या आधीच सर्व प्रकरण पाहण्यासाठी चौकशी करण्यासाठी आलो आसतो पण तेथील परिस्थिती पाहून आपला संयम सुटला असता आणि मूळ मुद्दा बाजूला राहिला आसता आणि सरकार ला नेमके तेच हवे आहे. म्हणून जे काही बोलाचे आहे ते मी १२ तारखेच्या जाहीर सभे मध्ये बोलूच.

जय महाराष्ट्र.

बाळासाहेबाना राज ठाकरे यांचे उत्तर…(कल्याण-डोंबिवली निवडणूक)

ऑक्टोबर 25, 2010 १ प्रतिक्रिया

नुकतेच झलेल्या शिवसेना प्रमुखांच्या सभेला उत्तर देत राज ठाकरे यानी केली बाळासाहेबानवर पहिल्यांदा टीका केली. मी कॉपी करत नसून ते तुमचेच संस्कार आहेत आसा टोला त्यानी लावला. जे मी लहान पणा पासून पाहत आलो, प्रत्येक सभेमधे लहान पणापासून गेलो आहे त्यानी मला नेल आहे मग माझयावर तेच संस्कार झाले आहेत. बाळासाहेबांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उद्धवला शिवसेनेचा कार्यध्यक्ष करण्याचा निर्णय राजचा होता असं वक्तव्य केलं होतं. मला त्याबद्दल काही माहिती नव्हतं या वर राज यानी बाळासाहेबानवर टीका केली.

बाळासाहेबांच्या मनात जे होते तेच मी केला. उद्धवला शिवसेनेचा कार्याध्यक्ष करण्याचा माझा निर्णय योग्य होता की अयोग्य? हेच मला सांगा आसा सावाल त्यानी शिवसेना प्रमुखाना केला. मी घेतलेला निर्णय अयोग्य होता तर मग तो माणूस तिथे काय करतोय. आणि जर योग्य आहे तर मग माझे बाकीचे निर्णय चुकीचे कसे? आसा सवाल या ठिकाणी राज यानी केला.

आपल्या भाषणात राज ठाकरेंनी कल्याण डोंबिवलीचा पूर्ण विकास करू आणि वचकनाम्यात केलेल्या घोषणा पूर्ण करूच आसे सांगत पूर्ण सत्ता माणसेला द्या असे वक्तव्य राज यानी केला.

आबु आझमीचे राजकारण

नोव्हेंबर 20, 2009 १ प्रतिक्रिया

आबु आझमीचे राजकारण या आझजमीचा यू पी मधे सत्कार केला जातो का तर त्याने महाराष्ट्राच्या विधान सभेमधे राज ठाकरेना ना घाबर्ट हिंदी मधून शपथ घेतली. पण हा मुद्दा राज ला घाबरण्याचा नवता तो होता तो मराठी भाषेचा. मनसे जे विधान सभेमधे केले याला जबाबदार आझमीच होता. जर महाराष्टाची मातृभाषा मराठी आहे आणि विधान सभेचे कामकाज हे मराठी मधून चालते मग मराठी मधून शपथ घ्याला कुठे भिघडले? बाकीच्या भाषेंचा कधी विरोध नवतच आणि आजुन पण नाही. पण मराठीला पहिले प्रधाण्या दिले पाहिजे. जो अबु आझमी महाराष्ट्रा मधे गेली २५ वर्षे राहतोय तर मराठी येऊ शकत नाही? इथे बाहरेऊन येणारा कमीत कमी ६ महिन्यांमधे बर्‍यापैकी मराठी बोलू शकतो.

आधी सांगून कळले नाही आणि आता मराठी शिकण्यासाठी एक शिक्षक नेमला आहे. याच जर गोस्टी पहिल्या केल्या आसत्या तर एवढे भांडण झले नसते. म्हणे आता आझमी आठ दिवसात मराठी शिकणार आणि विधानसभेतील कामकाज हिंदीत चालण्यासाठी प्रयत्न करणार कश्यासाठी? हे चाललेले राजकारण नाही का? आझमी म्हणतात की भांडण आधी राज ठाकरेनी सुरू केला. ते भांडण नवते त्यांची एक एटत्चा होती की सगलयानी मराठी मधून बोलावे शपथ घ्यावी. जर महाराष्ट्राचे कामकाज जर मातृ भाषेतून होत आसेल तर मग विधान सभेमधले कामकाज हिंदीत चालण्यासाठी कश्यला प्रयत्‍न करायचे?
बाहेरच्या राज्यांमधे त्यांच्या भाषेमधून कामकाज चालते ना. मग या मागे अबु आझमीचे राजकारण नाही तर काय आहे?

राज ठाकरे यांचे भाषण

नोव्हेंबर 14, 2009 12 comments

Raj1Raj2Raj3

आझमींना मनसेची धक्काबुक्की


प्रवर्ग: Uncategorized टॅगस्, , , ,

महराष्ट्रा चे एक उत्तम व्यक्तिमत्व- राज ठाकरे


Raj thackeray

मराठी साठी, मराठी भाषेसाठी, मराठी जनतेसाठी पेटून उठणरा आवाज म्हणजे मा.राज ठाकरे.  राज ठाकरे शिवसेनेमधे असल्यापासून मराठीच्या हक्कसाठी, मराठी जनतेसाठी लढत आहेत.राज ठाकरे याच्यामधे सर्वा गुण बाळासाहेबानसारखे आहेत. राज हे पण एक उत्तम व्यंगचित्रकार आहेत.

प्रवर्ग: Uncategorized टॅगस्, , , ,