मुखपृष्ठ > mumbai, Pune, Uncategorized > “लोकपाल बिल” मध्ये नक्की काय आहे?

“लोकपाल बिल” मध्ये नक्की काय आहे?


१. केंद्रामध्ये “लोकपाल” नावाची संस्था काढली जाईल आणि प्रत्येक राज्यामध्ये या संस्थेचा “लोकायुक्त” निवडला जाईल.

२. सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोग यांच्याप्रमाणेच लोकपाल आयोग हा सुद्धा शासनापासून पूर्णपणे स्वतंत्र असेल. कोणताही सारकारी अधिकारी किंवा नेता या आयोगावर नियंत्रण ठेवू शकणार नाही.

३. भ्रष्टाचाराचा कुठलाही खटला वर्षानुवर्षे चालणार नाही. चौकशी साठी जास्तीत जास्त १ वर्ष आणि खटल्यासाठी १ वर्ष दिला जाईल, जेणेकरून २ वर्षांत शिक्षेची अंमलबजावणी होईल.

४.आरोप सिद्ध झाल्यावर सर्व नुकसान त्या व्यक्तीकडून वसूल केले जाईल.

५. सामान्य जनतेला या बिलाचा फायदा काय? …

……आपले कुठलेही सरकारी काम जर सुनिश्चित वेळेत झाले नाही तर लोकपाल विधेयाकानुसार जबाबदार सरकारी अधिकार्‍याकडून दंड वसूल केला जाईल आणि तो नुकसानभरपाई म्हणून आपल्याला दिला जाईल.

६.म्हणजेच, जर तुमचे रेशनकार्ड/ मतदानओळखपत्र/ पासपोर्ट यासाठी निश्चित वेळेपेक्षा जास्त वेळ लागला असेल तर तुम्ही लोकपाल आयोगाकडे जाऊ शकता. लोकपाल तुमचे काम १ महिन्याच्या अवधीत पूर्ण करेल. शिवाय रेशनदुकानावर खराब धान्य, खराब रस्ते, पंचायत फंड घोटाळा अश्या तक्रारीही तुम्ही लोकपालकडे करू शकता. लोकपाल आयोग जास्तीत जास्त २ वर्षांत याविषयी पूर्ण निर्णय देईल.

७.पण या आयोगवर आयुक्त सरकार नेमेल का? नाही! आयुक्ताची निवड ही नागरिक आणि न्यायमूर्ती करतील. कुठल्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय!

८.आणि लोकपालमधलाच एखादा अधिकारी भ्रष्ट निघाला तर? नाही! या आयोगाचे काम पूर्णपणे पारदर्शक असेल. त्या अधिकर्‍याची २ महिन्यात चौकशी करून दोषी आढळल्यास त्वरित हकालपट्टी केली जाईल.

९.मग सध्याच्या भ्रष्टाचार विरोधी यंत्रणा बंद पडणार का? नाही… या सर्व यंत्रणा “लोकपाल” मध्ये समाविष्ट कार्यात येतील.

१०.ज्या व्यक्तीने भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवला आहे त्याच्या जिविताची काळजी घेण्याची पूर्ण जबबदारी लोकपाल आयोगाची असेल.

११.आणि सगळ्यात महत्वाचे… लोकपाल आयोगाकडे कोणताही अधिकारी, नेता आणि न्यायाधीश यांची चौकशी करण्याचे अधिकार असतील.

प्रवर्ग: mumbai, Pune, Uncategorized टॅगस्, ,
 1. mahendra nikumbh
  सप्टेंबर 14, 2011 येथे 2:29 pm

  lokpal bilabaddal adhik mahiti milali

 2. mukesh yesansure
  ऑक्टोबर 20, 2011 येथे 2:21 pm

  anna hazare is great person….

 3. kalpana banda ombale
  नोव्हेंबर 11, 2011 येथे 10:24 सकाळी

  Me ya lokpal-vidyaka shi sahamat aye.

 4. Deepak Kambali
  नोव्हेंबर 30, 2011 येथे 11:51 सकाळी

  मला लोकपाल बिल मध्ये काय आहे याची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ….!!
  माझे प्रश्न =:१) जनतेने निवडून दिलेला नेता जर आपली कामे निट करत नसेल तर किंवा तो कामे करायचे टाळत असेल तर लोकपाल बिल मध्ये कोणती तरतूद केली आहे आणी त्यांना कोणती शिक्षा केली जाईल ..
  २)कोणते काम किती दिवसात पूर्ण होईल याची माहिती सामान्य जनतेला माहित करून देण्यासाठी आपण लोकपाल बिल मध्ये काय तरतूद केली आहे.(कृपया सुनिच्चीत वेळ /दिवस हे जनतेला सागावे)
  ३) पोलीस भरती वेळी आणि इतर सरकारी नोकरी भरती मध्ये खूप प्रमाणात भ्रष्टाचार (लाचखोरी) होतो त्याला आळा घालण्यासाठी तसेच पोलीस व सरकारी अधिकारी मोठ्या प्रमाणात उघडपणे जनतेकडून लाच घेतात यासाठी कोणती तरतूद आहे.
  ४) आपल्या भारताचा खूप सारा पैसा स्वीज बैंक मध्ये आहे तो भारतात आणण्यासाठी आणि या सर्व पैशाचा कर बुडवल्याबद्दल त्या वैक्तीला काय शिक्षा कराल ……..

 1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: