मुखपृष्ठ > Uncategorized > आमदार रमेश वांजळे यांचे निधन

आमदार रमेश वांजळे यांचे निधन


पुणे – “गोल्डमॅन’ म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात परिचित असलेले खडकवासला मतदारसंघातील मनसेचे आमदार रमेश वांजळे (वय ४५) यांचे आज (शुक्रवार) रात्री ९.५० वाजता आकस्मिक निधन झाले. अत्यवस्थ वाटू लागल्याने त्यांना सायंकाळी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

वांजळे हे नियमित तपासण्यांसाठी पुण्यातील जोशी रुग्णालयात दाखल झाले. त्याच वेळी त्यांना त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना तातडीने अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर तातडीचे उपचार केल्यानंतर जहांगीर रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांच्या तब्येतीचे वृत्त कळताच कार्यकर्त्यांची जहांगीर रुग्णालयात गर्दी झाली.

गरिबांच्या हाकेला धावून जाणारा कार्यकर्ता आणि अंगावरील अडीच किलो सोन्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या वांजळे यांनी अल्पावधीत महाराष्ट्रात आपली प्रतिमा निर्माण केली. आपल्या भारदस्त व्यक्तिमत्त्वामुळे त्यांनी अनेकांना आपलेसे केले. हवेली तालुक्‍यातील अहिरे गावचे सरपंच ते खडकवासला मतदारसंघाचे आमदार असा राजकीय पल्ला त्यांनी गाठला.

२५ वर्षांहून अधिक काळ राजकारणात असलेल्या वांजळे यांनी नऊ वर्षांपूर्वी हवेली पंचायत समितीचे उपसभापतिपद भूषविले होते. त्यांच्या पत्नीही कॉंग्रेस पक्षाच्या चिन्हावर जिल्हा परिषदेच्या सदस्य म्हणून निवडून आल्या.

कॉंग्रेसचे नेते आणि माजी मंत्री (कै.) रामकृष्ण मोरे यांचे वांजळे निष्ठावंत कार्यकर्ते होते. विधानसभेच्या २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत वांजळे यांना खडकवासला मतदारसंघातून मनसेची उमेदवारी मिळाली. ऐन वेळी पक्षबदल करूनही ते पहिल्याच प्रयत्नात चांगल्या मताधिक्‍याने विजयी झाले. आपल्या अंगावरील अडीच किलो सोन्यामुळे सोनेरी आमदार म्हणून ते प्रसिद्ध झाले. विधानसभेतही त्यांनी आपला ठसा उमटविला. विधानसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेण्यावरून अबू आझमी आणि मनसे यांच्यात वाद झाला होता.

Source:- Sakal paper http://72.78.249.107/esakal/20110610/5701063914743789129.htm

  1. Atul Kothale
    जून 10, 2011 येथे 7:17 pm

    ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देओ…

  2. जून 13, 2011 येथे 4:07 pm

    मला हा माणूस आवडायचा तो त्याच्या असलेल्या तुकारामाच्या गाथेच्या व्यासंगामुळे आणि किर्तना मुळे. खूप मोठी हानी झाली मनासे ची.

  1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: