मुखपृष्ठ > mumbai, Pune > स्वागत करूया नवीन वर्षाचे २०११

स्वागत करूया नवीन वर्षाचे २०११


पाहता पाहता नवीन वर्ष कधी आले समजलेच नाही. हे वर्ष गाजले ते राजकारण ने. प्रत्येक नवीन घडामोडीने. नुकताच गाजला तो आदर्श घोटाळा प्रकरण. या घोटाळया मुळे बरेच राजकारणी माणसे गोत्यात आली. अशोक चव्हाण यांना तर आपली खुर्ची गमवावी लागली.

पुण्यात प्रकरण गाजले ते दादाजी कोंडदेव यांच्या पुतळ्यावरून. कित्येक वर्षानपासून पुतळा तिथेच होता, जेव्हा तिथे स्थापन केला तेव्हा काही कोणी आक्षेप नाही घेतला पण आता या गोष्टींवरून राजकारण होत आहे या सगळ्या गोष्टी कुठे न कुठे थांबवल्या पाहिजेत. या सगळ्या गोष्टींवरून पुणे बंद आणि बस फोडल्या गेल्या या सगळ्या गोष्टी थांबल्याच पाहिजे. आपण आपल्याच मालमत्तेचे नुकसान करतो आहोत.

जाळपोळ करण्यापेक्षा ज्या गोष्टींसाठी आंदोलन करायचे आहेत ते करायला पाहिजे. पेट्रोल चे दर तब्बल २-३ वेळा वाढले. भाज्या महागल्या या कडे सरकारने जातीने लक्ष घातले पाहिजे.

२०१० वर्षातले आजून एक प्रकरण गाजले ते म्हणजे सुरेश कलमाडी यांचे राष्ट्रकुल स्पर्धा मधील पैश्यांचा घोटाळा.

नुकताच छान पार पडला तो मराठी साहित्य संमेलन. आशाच फार छोट्या मोठ्या घडामोडी या २०१० मध्ये घडल्या.

काहीच वेळ राहिला आहे तो म्हणजे २०११ चे स्वागत करण्यासाठी. विशेष म्हणजे १-१-११ हे योगायोगच. २०११ चे स्वागत करण्यासाठी संपूर्ण मुंबई, पुणे सज्ज झले आहे. गोवा मध्ये तर सगळे समुद्र किनारे येणाऱ्या पर्यटक यांनी खच खचून गर्दी झली आहे ते नवीन वर्षाचे स्वागतासाठी. पूर्ण देशभरात २०११ स्वागताची तयारी झाली आहे. मुंबईमध्ये तसेच संपूर्ण शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मद्यपान करून वेडी वाकडी गाडी चालवणाऱ्या पोलीस कडक कारवाई करणार आहेत.

तर स्वागत करूयात येणाऱ्या नवीन वर्षाचे. हे येणारे वर्ष तुम्हाला सर्वाना छान सुखी समृद्धीचे जो हीच प्राथना. नवीन वर्षामध्ये नवीन आणि छान संकल्प करूयात आणि ते आमलात आणूयात.

New Year 2011

New Year 2011

  1. Vinay Bhutada
    डिसेंबर 31, 2010 येथे 5:32 pm

    फार छान वाटले आपले प्रकाशित केलेली पोस्ट. मी पण तुमच्याशी सहमत आहे.

    हे वर्ष सर्वाना सुखाचो जावो हीच ईश्वर चरणी प्राथना.

  1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: