मुखपृष्ठ > mumbai > कसाबला काय शिक्षा व्हावी..?

कसाबला काय शिक्षा व्हावी..?


कसाबला काय शिक्षा व्हावी?

मुंबई हल्ल्यातील एकमेव जिवंत सापडलेला अतिरेकी अजमल कसाबला कोणती शिक्षा व्हावी?
किंवा त्याला एक संधी देऊन सोडून देण्यात यावे?
मानवाधिकारवाले कसाबसाठी कोणती याचना करतील?
किंवा कसाबला शिक्षा झालीच तर ती अंमलात येईल की पुनः अफ़झल गुरुप्रमाणे राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करून तो ताटकळत राहील आणि कसाबच्या नैसर्गिक मरणाने तो मरेल??

त्यासाठी इतिहासातील मुस्लिम सुलतानांनी हिंदू राजांना केलेल्या शिक्षा पहा आणि मगच आपले मत मांडा.
इ.स.१३१८
देवगिरीचा जावई हरपालदेव याने दिल्लीच्या खिल्जी घराण्यातील मुबारकखान खिल्जीच्या विरोधात हिंदुत्वाची पताका फ़डकत ठेवण्याची “चूक” केल्याने मुबारकखानाच्या तावडित जिवंत सापडलेल्या हरपालदेवाला मुबारकखानाने जिवंतपणे कातडी सोलून ठार मारण्याची शिक्षा ठोठावली. इतकेच नव्हे तर त्यावेळी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज यासारखे फ़ुटकळ विषय नव्हतेच म्हणून लगेच कामाला सुरुवात होऊन हरपालदेवाची प्रथम गालवरील मांसाचा तुकडा सोलण्यात आला.मग एकेक करून डाळींबाच्या टरफ़लाप्रमाणे त्याची सर्व त्वचा सोलण्यात येऊन लोळगोळा झालेला त्याचा देह देवगिरीच्या वेशीवर टांगण्यात आला. हिंदुत्वाचा हा निखाराही इस्लामी अत्याचाराखाली पार विझून गेला. इस्लामच्या विरोधात हिंदुत्वाची पताका फ़डकावणार्‍याची काय गत होते यासाठी दहशत बसवण्यासाठी हा मुबारकखानाचा खटाटोप होता. मग कसाबचेही हे हिंदुत्वाविरोधात जिहादच होता असे तुम्हाल वाटत नाही का?

जानेवारी १५६५:-
विजयनगर सम्राट राजा रामराया मुस्लिम सेनेच्या तावडीत जिवंत सापडला. यावेळी विजयनगर साम्राज्याविरोधात ४ मुस्लिम सुलतान इस्लामसाठी एकत्र येऊन हिंदुत्वाविरोधात लढले होते. त्यापैकी हुसेन निजामशहाने वृद्ध रामरायाचे मस्तक छेदले. अली आदिलशहाने मेलेल्या रामरायाचे मस्तक निजामशहाकडून मागवून घेतले. मग आदिलशहाने रामरायाचे मस्तक पोखरून काढले, आतील मांस, मेंदू,रक्त वगैरे काढून ते मस्त्क त्याने साफ़ केले आणि विजापुरातील एका घाणमोरीच्या(संडासाच्या) तोंडाशी अशा कौशल्याने बसवले की त्या घाणमोरीतील घाण रामरायाच्या तोंडातून बाहेर यावी. कुठे “मरणानंतर वैर संपते” असे मानून अफ़ज़लखानाची कबर बांधणारे शिवराय आणि कुठे हे इस्लामी धर्मांध सुलतान….??

मार्च १६८९:-
औरंगजेबाच्या हाती जिवंत सापडलेल्या मराठ्यांचा राजा संभाजी राजांचे डोळे काढून, त्यांची कातडी सोलून तसेच जीभ छाटून अनन्वीत अत्याचार केले. हे अत्याचार सतत ४० दिवस चालू होते.मग रोज एकेक अवयव छाटून शेवटी शिरच्छेद करून अतिशय हालहाल करून राजांची हत्या औरंगजेबाने केली.

(इ.स.१६७५)

गुरू गोविंदसिंगांची हत्याही एका पठाणने केली तसेच त्यांच्या हजारो साथीदारांना कैद केले आणि इस्लामच स्वीकर करण्यास नकार देणार्‍या काहींना उकळत्या तेलात बुडवून तर काहींना कापसाच्या गुंडाळीत बांधून बाहेरून आग लावली व जिवंत जाळले.गुरु गोविंदसिंगांच्या दोन कोवळ्या मुलांनाही औरंगजेबाने सोडले नाही. त्यांच्यावरही त्याने धर्मातरणाची जबरदस्ती करून शेवटी न जुमानल्याने त्या दोघांनाही भिंतीत चिणून मारले. गुरु तेघबहाद्दरांचीही हत्या औरंगजेबाने दिल्लीच्या चांदणी चौकात सर्व लोकांसमोर शिरच्छेद करून केली. जेणेकरून इस्लामच्या विरोधात जाणार्‍यांना जबर दहशत बसावी.

संदर्भ:- टाईम्स ऑफ़ इंडिया, दि. २० ऑगस्ट१९९०.

काश्मिरात हिंदूंना पकडून त्यांच्या शरीरातील सर्व रक्त काढून घेण्यात येई, जे दहशतवाद्यांच्या इलाजासाठी वापरले जाई. ते मृतदेह नंतर झेलम नदीत फ़ेकून देण्यात येत. असे अनेक मृतदेह झेलम नदीत सापडले आहेत.

संदर्भ :- २६ मे,१९९० इंडियन एक्स्प्रेस
काश्मिरात एका गावातील हिंदूंना एकत्र करून इस्लामी दहशतवाद्यांनी बांधून टाकले. नंतर त्यांना जबर मारहाण करण्यात आली. त्यातील काही युवकांना सुर्‍याने बकरा कापावा तसे कापण्यात आले आणि त्यांचे मांस त्याच्या परीवारातील माणसांच्या तोंडात जबरदस्तीने कोंबण्यात आले. तसेच हिंदूंना गाईचे रक्त पिण्यास जबरदस्तीने भाग पाडले.
(पांच्जन्य, दि.१९ जून,१९९४)

आता तुम्हीच ठरवा या कसाबचे काय करायचे ते…. कारण राष्ट्रद्रोह आणि राष्ट्रप्रेम यातील फ़रक इथे सर्वानांच कळतो.

जय हिंद ! भारतमाता की जय..!!

प्रवर्ग: mumbai टॅगस्, , , ,
 1. sagar
  डिसेंबर 3, 2010 येथे 8:10 सकाळी

  kasab la solun thar marla pahije

 2. Shrikant Kumbhare
  नोव्हेंबर 5, 2011 येथे 8:30 pm

  मला तर अस वाटते कि सरकारने एवढा पैसा का खर्च केला ?
  तो तर एक आतंकवादी हाच पैसा जर लढाईत किवा जनते वर खर्च केला असता तर ?
  मी त्याच्या करिता आगळी वेगळी शिक्षा ठेवली आहे त्याच्या मुस्काटीत मारण्या करिता १००० रुपये ठ्ठुक्नया करिता ८००रुपये
  त्याच्या अंगावर सु करन्या करिता २०००रुपये आणि हा कार्यक्रम टीव्ही
  वर दाखवला पाहिजे आणि सरकारने आपले नुसकान भरून काढले पाहिजे

  • Deepak Kambali
   नोव्हेंबर 30, 2011 येथे 11:59 सकाळी

   yar pan aapalya sarakarala yevadha vichar karayala dok pahije na? sagala vichar te aapale khise kase garam rahatil yacha karatat…!tyachya pan bapach kahich jat nahi jat te aapalya sarakhya janatech ….!

 1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: