शिवसेना, भाजप, रिपाइंचे जागावाटप पूर्ण…
आगामी मुंबई महानगर पालिका निवडणुकी करिता महयुतीचे जावा वाटप पूर्ण झले असून याची घोषणा शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपचे नेते खासदार गोपीनाथ मुंडे आणि रिपाइं नेते रामदास आठवले हे तीनही नेते लवकरच करतील अशी माहिती मुंबई भाजपचे अध्यक्ष राज पुरोहित यानी आयोजित केलेल्या प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद मधे बोलले.
सरकार ने दिलेला शब्द पाळला नाही तर पुन्हा बेमुदत् उपोषण करणार.. अण्णा
जर सरकार ने सशक्त लोकपाल आणू असे सांगून पण जर दिलेला शब्द पाळला नाही तर याचा निषेध म्हणून एक दिवसाचे ११ डिसेंबर ला आणि २७ डिसेंबर पासून रामलीला मैदानात बेमूडात उपोषण करणार असा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला.
“लोकपाल बिल” मध्ये नक्की काय आहे?
१. केंद्रामध्ये “लोकपाल” नावाची संस्था काढली जाईल आणि प्रत्येक राज्यामध्ये या संस्थेचा “लोकायुक्त” निवडला जाईल.
२. सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोग यांच्याप्रमाणेच लोकपाल आयोग हा सुद्धा शासनापासून पूर्णपणे स्वतंत्र असेल. कोणताही सारकारी अधिकारी किंवा नेता या आयोगावर नियंत्रण ठेवू शकणार नाही.
३. भ्रष्टाचाराचा कुठलाही खटला वर्षानुवर्षे चालणार नाही. चौकशी साठी जास्तीत जास्त १ वर्ष आणि खटल्यासाठी १ वर्ष दिला जाईल, जेणेकरून २ वर्षांत शिक्षेची अंमलबजावणी होईल.
४.आरोप सिद्ध झाल्यावर सर्व नुकसान त्या व्यक्तीकडून वसूल केले जाईल.
५. सामान्य जनतेला या बिलाचा फायदा काय? …
……आपले कुठलेही सरकारी काम जर सुनिश्चित वेळेत झाले नाही तर लोकपाल विधेयाकानुसार जबाबदार सरकारी अधिकार्याकडून दंड वसूल केला जाईल आणि तो नुकसानभरपाई म्हणून आपल्याला दिला जाईल.
६.म्हणजेच, जर तुमचे रेशनकार्ड/ मतदानओळखपत्र/ पासपोर्ट यासाठी निश्चित वेळेपेक्षा जास्त वेळ लागला असेल तर तुम्ही लोकपाल आयोगाकडे जाऊ शकता. लोकपाल तुमचे काम १ महिन्याच्या अवधीत पूर्ण करेल. शिवाय रेशनदुकानावर खराब धान्य, खराब रस्ते, पंचायत फंड घोटाळा अश्या तक्रारीही तुम्ही लोकपालकडे करू शकता. लोकपाल आयोग जास्तीत जास्त २ वर्षांत याविषयी पूर्ण निर्णय देईल.
७.पण या आयोगवर आयुक्त सरकार नेमेल का? नाही! आयुक्ताची निवड ही नागरिक आणि न्यायमूर्ती करतील. कुठल्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय!
८.आणि लोकपालमधलाच एखादा अधिकारी भ्रष्ट निघाला तर? नाही! या आयोगाचे काम पूर्णपणे पारदर्शक असेल. त्या अधिकर्याची २ महिन्यात चौकशी करून दोषी आढळल्यास त्वरित हकालपट्टी केली जाईल.
९.मग सध्याच्या भ्रष्टाचार विरोधी यंत्रणा बंद पडणार का? नाही… या सर्व यंत्रणा “लोकपाल” मध्ये समाविष्ट कार्यात येतील.
१०.ज्या व्यक्तीने भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवला आहे त्याच्या जिविताची काळजी घेण्याची पूर्ण जबबदारी लोकपाल आयोगाची असेल.
११.आणि सगळ्यात महत्वाचे… लोकपाल आयोगाकडे कोणताही अधिकारी, नेता आणि न्यायाधीश यांची चौकशी करण्याचे अधिकार असतील.
राज्याचा एकूण निकाल ७१.४- परीक्षेत मुलींची बाजी

राज्यातील लाखो विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागून राहिलेल्या दहावी परीक्षेच्या निकाल आज (शुक्रवार) दुपारी जाहीर झाला. सपूर्ण राज्याचा एकूण निकाल ७१.४% लागला असून मुलीनी बाजी मारली आहे. उत्तीर्ण झलेल्या मुलींची संख्या ७४.१०% तर मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ६८.५८ आहे.
एकूण परीक्षेला बसलेले विद्यार्थी- १६ लाख ३२ हजार ७४८
एकूण उत्तीर्ण झालेले विद्यार्थी- ११ लाख ५९ हजार ९०७
पुणे विभागातून ८०.३९%, मुंबई ८०.३% तर कोल्हापूर चा ७९.७६% एवढा निकाल लागला आहे. तर सर्वात कमी अमरावती विभागाचा निकाल लागला आहे (४३.३२%).
आज दुपारी “ऑनलाईन’ पद्धतीने निकाल जाहीर झाला असून, विद्यार्थ्यांना छापील गुणपत्रिका २७ जून रोजी दुपारी ३ वाजता त्यांच्या विद्यालयांत दिल्या जाणार आहेत. गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही “बेस्ट फाईव्ह’ सूत्रानुसारच हा निकाल जाहीर करण्यात आल्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने कळविले आहे.
निकाल या संकेतस्थळांवर :-
http://mahresult.nic.in
www.msbshse.ac.in
www.mh-ssc.ac.in
www.rediff.com
www.studyssconline.com
www.myssc.in/sscresult
आमदार रमेश वांजळे यांचे निधन
पुणे – “गोल्डमॅन’ म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात परिचित असलेले खडकवासला मतदारसंघातील मनसेचे आमदार रमेश वांजळे (वय ४५) यांचे आज (शुक्रवार) रात्री ९.५० वाजता आकस्मिक निधन झाले. अत्यवस्थ वाटू लागल्याने त्यांना सायंकाळी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

वांजळे हे नियमित तपासण्यांसाठी पुण्यातील जोशी रुग्णालयात दाखल झाले. त्याच वेळी त्यांना त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना तातडीने अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर तातडीचे उपचार केल्यानंतर जहांगीर रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांच्या तब्येतीचे वृत्त कळताच कार्यकर्त्यांची जहांगीर रुग्णालयात गर्दी झाली.
गरिबांच्या हाकेला धावून जाणारा कार्यकर्ता आणि अंगावरील अडीच किलो सोन्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या वांजळे यांनी अल्पावधीत महाराष्ट्रात आपली प्रतिमा निर्माण केली. आपल्या भारदस्त व्यक्तिमत्त्वामुळे त्यांनी अनेकांना आपलेसे केले. हवेली तालुक्यातील अहिरे गावचे सरपंच ते खडकवासला मतदारसंघाचे आमदार असा राजकीय पल्ला त्यांनी गाठला.
२५ वर्षांहून अधिक काळ राजकारणात असलेल्या वांजळे यांनी नऊ वर्षांपूर्वी हवेली पंचायत समितीचे उपसभापतिपद भूषविले होते. त्यांच्या पत्नीही कॉंग्रेस पक्षाच्या चिन्हावर जिल्हा परिषदेच्या सदस्य म्हणून निवडून आल्या.
कॉंग्रेसचे नेते आणि माजी मंत्री (कै.) रामकृष्ण मोरे यांचे वांजळे निष्ठावंत कार्यकर्ते होते. विधानसभेच्या २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत वांजळे यांना खडकवासला मतदारसंघातून मनसेची उमेदवारी मिळाली. ऐन वेळी पक्षबदल करूनही ते पहिल्याच प्रयत्नात चांगल्या मताधिक्याने विजयी झाले. आपल्या अंगावरील अडीच किलो सोन्यामुळे सोनेरी आमदार म्हणून ते प्रसिद्ध झाले. विधानसभेतही त्यांनी आपला ठसा उमटविला. विधानसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेण्यावरून अबू आझमी आणि मनसे यांच्यात वाद झाला होता.
Source:- Sakal paper http://72.78.249.107/esakal/20110610/5701063914743789129.htm
छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा..
निश्र्चयाचा महामेरू, बहुतजनांसी आधारू, अखंडस्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी ।।
नरपती, हयपती, गजपती। गडपती, भूपती, जळपती।पुरंदर आणि शक्ति पृष्ठभागी।।
यशवंत, कीर्तीवंत, सामर्थ्यवंत। वरदवंत, पुण्यवंत, नीतीवंत। जाणता राजा ।।
आचरशील, विचारशील, दानशील। धर्मशील सर्वज्ञपणे सुशील। सकळाठाई ।।
धीर उदार गंभीर। शूर क्रियेसी तत्पर ।सावधपणे नृपवर तुच्छ केले।।
देवधर्म गोब्राह्मण, करावया संरक्षण।।
हृदयस्थ झाला नारायण, प्रेरणा केलीया भूमंडळाचे ठाई, धर्मरक्षी ऐसा नाही।
महाराष्ट्र धर्म राहिला काही, तुम्हा कारणी।।कित्येक दृष्ट संहारली।
कित्येकासी धाक सुटला ।कित्येकाला आश्रयो जाहला
।शिवकल्याण राजा। शिवकल्याण राजा।।शिवकल्याण राजा।।।
छत्रपती शिवाजीराजे भोसले
अधिकारकाळ जून ६, १६७४ – एप्रिल ३, १६८०
राज्याभिषेक जून ६, १६७४
राज्यव्याप्ती पश्चिम महाराष्ट्र, कोकण,सह्याद्री डॊंगररांगांपासून नागपूरपर्यंतआणिउत्तर महाराष्ट्र, खानदेशापासूनदक्षिण भारतात तंजावर पर्यंत
राजधानी
रायगड
पूर्ण नाव शिवाजीराजे शहाजीराजे भोसले
पदव्या गोब्राह्मणप्रतिपालक
जन्म फेब्रुवारी १९१, १६३० शिवनेरी किल्ला, पुणे
मृत्यू एप्रिल ३, १६८० रायगड
उत्तराधिकारी छत्रपती संभाजीराजे भोसले
वडील शहाजीराजे भोसले
आई जिजाबाई
पत्नी सईबाई,सोयराबाई,पुतळाबाई,काशीबाई,सकवारबाई
संतती छत्रपती संभाजीराजे भोसले,
छत्रपती राजारामराजे भोसले
राजघराणे भोसले
राजब्रीदवाक्य
‘प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।’
चलन होन, शिवराई (सुवर्ण होन, रुप्य होन??)
१ – जन्मदिनांकाच्या निश्चितीबद्दल मतमतांतरे आहेत.
माहितिचा स्त्रोत विकिपिडिया.कॉम
थोरल्या आबा साहेबांना मानाचा मुजरा!!!
जय भवानी जय शिवाजी
आर आर पाटील आणि अजित पवार यांच्या वर टीका

औरंगाबाद मध्ये हर्षवर्धन जाधव यांच्या वर झलेल्या हल्ला प्रकरणी आज राज थांक्रे यांनी जाहीर सभा घेतली आणि सगळ्यांचा भरपूर समाचार घेतला. आर आर पाटील आणि उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या वर टीका केली. त्याच प्रमाणे त्यांनी मुख्य मंत्र्यांवर पण हल्ला चढवला. पोलीस उगाचच आमदारावर मारहाण करणार नाहीत. गृहमंत्री आर. आर. पाटील व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशावरूनच पोलिसांनी आमदार हर्षवर्धन जाधव यांना मारहाण केली असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला.
सभेमध्ये राज यांनी संभाजी ब्रिगेड वर पण टीका करत बोलले कि यांना सत्ताधारी राजकीय गटांचा पाठिंबा आहे. या आधी संभाजी ब्रिगेड ने केलेल्या हिंसक कृत्यावर कोणती हि कारवाई करण्यात आली नाही.
राज यांनी सभे मध्ये पोलिसांबद्दल पण उद्गार काढले कि २-४ पोलिसांच्या मुळे पूर्ण पोलिसांना चुकीचे समजू नये. कोणत्या हि लोकांनी कधी हि पोलिसांवर हात उगारू नये आसे हि म्हणाले.
आमदार हर्षवर्धन यांना मारून पोलीस स्टेशन ला नेऊन त्यांना निर्वस्त्र करून मारहाण करण्यात आली. बेदम मारण्यात आल. पण जेव्हा त्यान चौकीत नेला तेव्हा पाऊन तास पोलीस थांबले मग तिकडून फौज आली मग मला सांगा कि पाऊन तास कोणासाठी थांबले होते ते?? वरून आदेशाची वाट पाहत होते असे उद्गार राज यांनी काढले.
दादोजी कोंडदेव यांच्या पुतळ्या प्रकरणी जे चालले आहे ते जातीय राजकारण हे विष आहे. इतिहास जातीच्या चष्म्यातून पाहणे चुकीचे आहे. अशा राजकारणामुळे शिवाजी महाराजांचीच विटंबना होत आहे.
आजच्या सभेसाठी विक्रमी गर्दी झली होती. सभेला सुमारे २५ हजार लोकांची गर्दी होती.
12 तारखेला विस्ताराने बोलणार- राज ठाकरे
हर्षवर्धन जाधव हे मनसेचे कन्नड येथील आमदार. जाधव यांना पोलिसांनी केलेल्या मारहाणीबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी राज ठाकरे औरंगाबाद मध्ये आले. त्यांनी आमदार हर्षवर्धन जाधव यांची घाटी रुग्णालयात जाऊन भेट घेतली.
या सर्व प्रकरण बद्दल मी येत्या १२ तारखेला जाहीर सभेमध्ये विस्ताराने बोलणार आहोत असे महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
हर्षवर्धन जाधव यांच्या वर मारहाण झाल्यापासून राज ठाकरे हे त्यांच्या आणि त्यांच्या आईंच्या संपर्कात होते. या सर्व प्रकरणाची पाहणी आमदार बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या नेत्यांनी सर्व माहिती घेतली.
राज ठाकरे पत्रकार परिषदेत म्हणाले कि मी या आधीच सर्व प्रकरण पाहण्यासाठी चौकशी करण्यासाठी आलो आसतो पण तेथील परिस्थिती पाहून आपला संयम सुटला असता आणि मूळ मुद्दा बाजूला राहिला आसता आणि सरकार ला नेमके तेच हवे आहे. म्हणून जे काही बोलाचे आहे ते मी १२ तारखेच्या जाहीर सभे मध्ये बोलूच.
जय महाराष्ट्र.
स्वागत करूया नवीन वर्षाचे २०११
पाहता पाहता नवीन वर्ष कधी आले समजलेच नाही. हे वर्ष गाजले ते राजकारण ने. प्रत्येक नवीन घडामोडीने. नुकताच गाजला तो आदर्श घोटाळा प्रकरण. या घोटाळया मुळे बरेच राजकारणी माणसे गोत्यात आली. अशोक चव्हाण यांना तर आपली खुर्ची गमवावी लागली.
पुण्यात प्रकरण गाजले ते दादाजी कोंडदेव यांच्या पुतळ्यावरून. कित्येक वर्षानपासून पुतळा तिथेच होता, जेव्हा तिथे स्थापन केला तेव्हा काही कोणी आक्षेप नाही घेतला पण आता या गोष्टींवरून राजकारण होत आहे या सगळ्या गोष्टी कुठे न कुठे थांबवल्या पाहिजेत. या सगळ्या गोष्टींवरून पुणे बंद आणि बस फोडल्या गेल्या या सगळ्या गोष्टी थांबल्याच पाहिजे. आपण आपल्याच मालमत्तेचे नुकसान करतो आहोत.
जाळपोळ करण्यापेक्षा ज्या गोष्टींसाठी आंदोलन करायचे आहेत ते करायला पाहिजे. पेट्रोल चे दर तब्बल २-३ वेळा वाढले. भाज्या महागल्या या कडे सरकारने जातीने लक्ष घातले पाहिजे.
२०१० वर्षातले आजून एक प्रकरण गाजले ते म्हणजे सुरेश कलमाडी यांचे राष्ट्रकुल स्पर्धा मधील पैश्यांचा घोटाळा.
नुकताच छान पार पडला तो मराठी साहित्य संमेलन. आशाच फार छोट्या मोठ्या घडामोडी या २०१० मध्ये घडल्या.
काहीच वेळ राहिला आहे तो म्हणजे २०११ चे स्वागत करण्यासाठी. विशेष म्हणजे १-१-११ हे योगायोगच. २०११ चे स्वागत करण्यासाठी संपूर्ण मुंबई, पुणे सज्ज झले आहे. गोवा मध्ये तर सगळे समुद्र किनारे येणाऱ्या पर्यटक यांनी खच खचून गर्दी झली आहे ते नवीन वर्षाचे स्वागतासाठी. पूर्ण देशभरात २०११ स्वागताची तयारी झाली आहे. मुंबईमध्ये तसेच संपूर्ण शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मद्यपान करून वेडी वाकडी गाडी चालवणाऱ्या पोलीस कडक कारवाई करणार आहेत.
तर स्वागत करूयात येणाऱ्या नवीन वर्षाचे. हे येणारे वर्ष तुम्हाला सर्वाना छान सुखी समृद्धीचे जो हीच प्राथना. नवीन वर्षामध्ये नवीन आणि छान संकल्प करूयात आणि ते आमलात आणूयात.
महामानवाला कोटी कोटी प्रणाम.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ५४ व्या महापारीनीर्वाण दिनाला कोटी कोटी प्रणाम. डॉ. बाबासाहेबानसारखा नाही कधी झाला आणि नाही कधी होणार. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापारीनीर्वाणा ला ५३-५४ वर्षे उलटून गेल्यानंतरही या दृष्टीने काही घडत नसेल तर याचा दोष सर्व्हारा पददलित वर्गाचे राजकारण करू पाहणार्या पण कुवत नसलेल्याआणी सटटेबजीच्या राजकारणात मतलाबचे राजकारण करणार्या समाज कारभार्याचा अहे.
या नमन करूया आणि या महामानवला अभिवादन करूया..
बाबासाहेबांच्या आठवणिना थोडासा उजाळा देऊ.. पहा बाबासाहेबांचे काही छायाचित्र
काही छायाचित्रे चैत्य भूमीचे. (छायाचित्रकार:- हेमंत नारायण जाधव.)

















